ग्रुप ग्रामपंचायत डोल्हारी खुर्द

डोल्हारी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४४९ कुटुंबे राहतात. एकूण २२६० लोकसंख्येपैकी ११३६ पुरुष तर ११२४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.हे गाव डोल्हारी (खुर्द) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येते आणि त्याची कृषी अर्थव्यवस्था आणि पश्चिम घाटाच्या जवळील परिसर याचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे या प्रदेशाच्या जैवविविधतेला आणि आदिवासी वारशाला हातभार लागतो. स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये १९५४ मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद शाळा समाविष्ट आहे, जी प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेल्या या भागातील समुदायाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या 
२२६0
पुरुष लोकसंख्या
 ११३६
महिला लोकसंख्या % 
११२४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३७९
अनुसूचित जाती (SC %) 
0
अनुसूचित जमाती (ST %)
९९.५६% 
७ 
विशेष दुर्बल आदिवासी गट (PVTG) लोकसंख्या
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही नाही 
उपकेंद्र (Sub Center)नाही 0नाही 
अंगणवाडीहोय होय
प्राथमिक शाळाहोय होय
माध्यमिक शाळाहोय होय
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत डोल्हारी खुर्द 

बँकेचे नाव : द ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल को.ओप.बँक एलटीडी 

शाखेचे नाव: विक्रमगड 

अकाउंट नंबर : 002400300000330 

आई एफ एस सी कोड : TDCB0000024 

पत्ता : मु.डोल्हारी खुर्द, पो. गडदे, तालुका-विक्रमगड, जिल्हा-पालघर 

Scroll to Top